बातम्या
इलेक्ट्रिक सायकल चोरी प्रकरणी आरोपी अटकेत
By nisha patil - 2/19/2025 6:00:44 PM
Share This News:
कोल्हापूर, दि. १९ फेब्रुवारी २०२५ - शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने इलेक्ट्रिक सायकल चोरीप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. हुसेन गुलाब जमादार (वय २४, रा. घालवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
फिर्यादी संजय आण्णासो पाटील (वय ४०, व्यवसाय - व्यापारी, रा. श्रीरंग अपार्टमेंट, महाडिक माळ, कोल्हापूर) यांनी शाहुपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती की, त्यांच्या घराच्या पार्किंगमधून ३१ जानेवारी रोजी रात्री ११.३० ते १ फेब्रुवारी सकाळी ८.०० वाजण्याच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांची इलेक्ट्रिक सायकल चोरून नेली. या तक्रारीनंतर शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस कॉन्स्टेबल रवी आंबेकर यांना तपासाची जबाबदारी दिली. पार्किंगमधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला. फुटेजमध्ये आरोपी मुक्त सैनिक सिग्नल, मार्केट यार्ड, तावडे हॉटेल चौक, सांगली फाटा, हालोंडी, अतिग्रे, हातकणंगले मार्गे नांदणी फाटा या मार्गावर जात असल्याचे दिसून आले.
या आधारे जयसिंगपूर व नांदणी परिसरात चौकशी केली असता, आरोपीचा शोध लागला. पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, १७ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता मध्यवर्ती बस स्थानक परिसरात आरोपी दिसून आला. त्याला अडवून चौकशी केली असता, सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी विश्वासात घेतल्यावर त्याने चोरी कबूल केली.
पोलिसांनी आरोपीस अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता, २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार विलास खोत करीत
इलेक्ट्रिक सायकल चोरी प्रकरणी आरोपी अटकेत
|