राजकीय
कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावर शिंदे यांच्या शिवसेनेचा विजय, प्रकाश आबिटकर यांना पालकमंत्री पद
By nisha patil - 1/18/2025 11:16:50 PM
Share This News:
*कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावर शिंदे यांच्या शिवसेनेचा विजय, प्रकाश आबिटकर यांना पालकमंत्री पद*
*कोल्हापूर: अखेर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावर विजय मिळवला आहे. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. यावेळी वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून हसन मुश्रीफ यांची नियुक्ती केली आहे.*
गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात कोल्हापूरपासून संपर्क तुटलेल्या उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूरच्या जवळ आणून सांगलीचे पालकमंत्री पद दिले गेले आहे. महायुती सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात कोल्हापूरच्या पालकमंत्री पदाची धुरा हसन मुश्रीफ यांनी सांभाळली होती, परंतु विधानसभा निवडणूक झाल्यानंतर ते पुन्हा या पदासाठी आग्रही होते. भाजपच्या सूत्रानुसार, आगामी काळात ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांना पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता होती.
कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावर शिंदे यांच्या शिवसेनेचा विजय, प्रकाश आबिटकर यांना पालकमंत्री पद
|