बातम्या

इचलकरंजीतील यंत्रमाग धारकांसाठी स्नेहभोजन कार्यक्रम – वीज सवलतीची दिली मोठी घोषणा

program for loom owners in Ichalkaranji


By nisha patil - 9/30/2024 11:39:57 AM
Share This News:



इचलकरंजी: इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन आणि डि.के.टी.ई. यांच्या संयुक्त विद्यमाने यंत्रमाग धारक, कारखानदार, व्यापारी आणि विविध असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा स्नेहभोजन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला आमदार प्रकाशआण्णा आवाडे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे, कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे, डि.के.टी.ई. संचालक रवी आवाडे, सौ. मोश्मी आवाडे यांच्या प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात महत्त्वपूर्ण घोषणा करत आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी वस्त्रोद्योगातील धारकांना मोठी दिलासा देणारी वीज सवलत जाहीर केली. 15 मार्च 2024 पासून 27 एच. पी. वरील आणि खालील यंत्रमागांसाठी अनुक्रमे प्रति युनिट 75 पैसे आणि 1 रुपया सवलत लागू होणार आहे. या सवलतीमुळे इचलकरंजी व परिसरातील यंत्रमाग धारकांचे वार्षिक 110 कोटी रुपयांचे बचत होणार आहे, त्यातील 40 कोटी रुपये पूर्वलक्षी प्रभावाने दोन वीज बिलांमध्ये कमी झाले आहेत.

या सवलतीसाठी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्या वतीने आणि विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार प्रकाशआण्णा आवाडे आणि जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांचे सत्कार करून आभार व्यक्त केले.

यावेळी डि.के.टी.ई. संस्थेचे खजिनदार प्रकाश दत्तवाडे, सन्मती बँकेचे चेअरमन सुनिल पाटील, पॉवरलूम असोसिएशनचे चेअरमन चंद्रकांत पाटील, व्हा. चेअरमन रफिक खानापुरे यांच्यासह विविध असोसिएशनचे पदाधिकारी, कारखानदार आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


इचलकरंजीतील यंत्रमाग धारकांसाठी स्नेहभोजन कार्यक्रम – वीज सवलतीची दिली मोठी घोषणा