बातम्या

आषाढी एकादशी निमित्त डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते प्रसादाचे वाटप

rahul avade


By nisha patil - 7/18/2024 10:11:35 PM
Share This News:



इचलकरंजी : आज आषाढी एकादशी निमित्त इचलकरंजी येथील थोरात चौक विठ्ठल मंदिर येथे माजी खासदार सहकारमहर्षी कल्लापाण्णा आवाडे, आमदार प्रकाशआण्णा आवाडे व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी विठू माऊलींची पूजा करून मनोभावे दर्शन घेतले. विठुराया आणि रखुमाईच्या कृपेने सर्व नागरिकांना सुख, समृद्धी आणि आरोग्य प्राप्त होवो अशी प्रार्थना केली. तसेच भक्तीरसाने न्हाऊन निघालेल्या सर्व विठ्ठल भक्तांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा देत दर्शनासाठी आलेल्या माउलींना आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते प्रसादाचे वाटप करण्यात आले.यावेळी माजी आरोग्य सभापती संजय केंगार, माणुसकी फाउंडेशनचे संथापक अध्यक्ष रवी जावळे, मसाजी केंगार, दादू गेजगे, नामदेव गेजगे, राजाराम शिंदे सरकार, गोरख हत्तीकर, प्रकाश केंगार सर, शैल जावळे, विवेक भोसले, आनंदा कोरे, बजरंग ठाणेकर, संदीप भडंगे, गणेश हत्तीकर, प्रताप लाखे, बाळू केंगार, बाळकृष्ण हत्तीकर, उत्तम गुळगे, शशिकांत गुळगे, रामा पाटील, सिधुराम शेखा व विठ्ठल भक्त उपस्थित होते.


आषाढी एकादशी निमित्त डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते प्रसादाचे वाटप
Total Views: 24