बातम्या

समाजभूषण पुरस्कार 2024' च्या मानकरी ठरल्या 'तेज कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट च्या स्नेहल राजेंद्र चोरगे

samajbhushan puraskar 2024


By Administrator - 7/8/2024 1:53:14 PM
Share This News:



' समाजभूषण पुरस्कार 2024' च्या मानकरी ठरल्या 'तेज कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट च्या स्नेहल राजेंद्र चोरगे

विद्या दानातुनं मिळतं स्वावलंबनाचे फळ ।
असे महाविद्येचे दान, जीचं पुण्य अपरंपार ॥

कोल्हापूर :गेल्या 4 वर्षे पासुन 'तेज कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट', उजळाईवाडी च्या प्रोपा. सौ. स्नेहल राजेंद्र चोरगे, यांनी समाजातील गरजू, होतकरू विद्यार्थी व विद्यार्थिनीना कमवा व शिका योजनेतून प्रशिक्षण देवून व स्वावलंबी बनविले आहे तसेच त्यांना स्वतःच्या पायावरती सक्षमपणे उभे राहण्यासाठी मार्गदर्शन, मदत व प्रोत्साहन दिले असून त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल ' आशीर्वाद बहुउद्देशीय संस्था, महाराष्ट्र राज्य' यांनी घेवून 'तेज कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट' च्या प्रोप्रा. 'सौ . स्नेहल राजेंद्र चोरगे' यांना त्या करीत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल ' समाजभूषण पुरस्कार 2024 ' देऊन गौरवान्वित करण्यात आले.

 सदर पुरस्कार म्हणजे त्या करीत असलेल्या सामाजिक कार्याची पोचपावती आहे. सदरचा पुरस्कार हा त्या करीत असलेल्या त्यांच्या सामाजिक कार्याला अधिक प्रोत्साहन देणारा ठरो,त्यांचे पुढील वाटचालीस त्यांना शुभेछया देण्यात आल्या 


समाजभूषण पुरस्कार 2024' च्या मानकरी ठरल्या 'तेज कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट च्या स्नेहल राजेंद्र चोरगे