बातम्या
महिलांसाठी केंद्र सरकारची अनोखी योजना – ‘सुविधा सॅनिटरी नॅपकिन्स’ अवघ्या ५ रुपयांत उपलब्ध!
By nisha patil - 6/3/2025 1:03:29 PM
Share This News:
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जनऔषधी योजना (PMBJP) आणि मासिक पाळी स्वच्छता योजना (MHS) अंतर्गत महिलांसाठी उच्च दर्जाचे आणि परवडणाऱ्या दरातील सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत 10 सॅनिटरी नॅपकिन्सचे एक पॅक फक्त ₹5 मध्ये दिले जात आहे.
महिला आणि किशोरवयीन मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय असून, पर्यावरणपूरक दृष्टिकोनातूनही ही उत्पादने ऑक्सो-बायोडिग्रेडेबल घटकांपासून बनवली जात आहेत.
ही सुविधा देशभरातील जनऔषधी केंद्रांमध्ये उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी जवळच्या जनऔषधी केंद्रात चौकशी करावी.
महिलांसाठी केंद्र सरकारची अनोखी योजना – ‘सुविधा सॅनिटरी नॅपकिन्स’ अवघ्या ५ रुपयांत उपलब्ध!
|