राजकीय
सुभाष रामचंद्र पाटील यांची मांगोली गावच्या उपसरपंचपदी निवड
By nisha patil - 3/22/2025 7:26:54 PM
Share This News:
प्रतिनिधी : विक्रम केंजळकर
मांगोली : मांगोली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुभाष रामचंद्र पाटील यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायतीच्या विशेष सभेत सर्वानुमते त्यांची निवड करण्यात आली.

सुभाष पाटील हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असून, गावाच्या विकासासाठी त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. निवडीनंतर त्यांनी गावातील नागरिकांचे आभार मानले आणि विकासकामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला.

या वेळी ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक नेते आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या समर्थकांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
सुभाष रामचंद्र पाटील यांची मांगोली गावच्या उपसरपंचपदी निवड
|