बातम्या
निलेश कुंभार यांची भारतीय सैन्यात अग्नीवीर म्हणून निवड;
By nisha patil - 3/22/2025 6:00:10 PM
Share This News:
सांगली (प्रतिनिधी): कुंभार कुटुंबासाठी आणि संपूर्ण गावासाठी अभिमानास्पद क्षण ठरला आहे! चि. निलेश महादेव कुंभार यांची भारतीय सैन्य दलात ‘अग्नीवीर’ म्हणून निवड झाली असून, या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
लहानपणापासून देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून कठोर मेहनत करणाऱ्या निलेशने हे ध्येय साकार करत लक्ष्य करिअर अकॅडमी आणि कुंभार कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या अभिमानास्पद यशामुळे कुंभार कुटुंबात तसेच मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण आहे.
निलेशच्या निवडीबद्दल त्यांचे लक्ष्य करिअर अकॅडमी आणि कुंभार परिवाराने हार्दिक अभिनंदन केले असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
निलेश कुंभार यांची भारतीय सैन्यात अग्नीवीर म्हणून निवड
|