बातम्या
कुमार संकल्प विजय निर्मळेचा चर्मकार समाजातर्फे सत्कार
By nisha patil - 3/29/2025 2:41:12 PM
Share This News:
टाकळीवाडी प्रतिनिधी
टाकळीवाडी (ता. शिरोळ) येथील आणि सध्या दत्तवाड येथे राहणाऱ्या कुमार संकल्प विजय निर्मळे याची जवाहर नवोदय विद्यालय, कागल येथे निवड झाली आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल चर्मकार समाजातर्फे त्याचा सत्कार करण्यात आला.
कुमार संकल्प हा जिल्हा परिषद शाळा, कुमार विद्यामंदिर, दत्तवाड या शाळेत इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेत आहे. त्याच्या अथक परिश्रमाला आणि गुणवत्तेला प्रतिसाद देत नवोदय विद्यालयासाठी त्याची निवड झाली आहे, ही संपूर्ण गावासाठी आणि समाजासाठी अभिमानाची बाब आहे.
या प्रसंगी समाजसेवक अर्जुन धुमाळे, माजी सैनिक लक्ष्मण निर्मळे, माजी सैनिक भागोजी निर्मळे, सचिन निर्मळे, युवराज माने, महादेव निर्मळे, नामदेव निर्मळे आदींनी त्याचा सत्कार करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी संकल्पच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत, त्याच्या यशामुळे समाजातील इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, असे मत व्यक्त केले.
कुमार संकल्प विजय निर्मळेचा चर्मकार समाजातर्फे सत्कार
|