बातम्या

*शिवसेना पक्षाचे संसदीय गटनेते खासदार श्रीकांत शिंदे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर*

shrikant shinde tommorow in kolhapur


By Administrator - 2/9/2024 4:55:00 PM
Share This News:



*शिवसेना पक्षाचे संसदीय गटनेते खासदार श्रीकांत शिंदे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर*

कोल्हापूर, २ सप्टेंबर: शिवसेना पक्षाचे संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे सध्या महाराष्ट्र राज्यात जनसंवाद दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याअंतर्गत विधानसभा निहाय पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींशी संवाद साधण्यासाठी आणि आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले जात आहे. या दौऱ्याचा दुसरा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात पार पडणार असून, ३ आणि ४ सप्टेंबर २०२४ रोजी खासदार श्रीकांत शिंदे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

उद्या, ३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता खासदार श्रीकांत शिंदे यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते आदमापूर कडे रवाना होतील आणि श्री संत बाळूमामा मंदिरास भेट देवून दर्शन घेतील. सकाळी ११ वाजता त्रिवेणी हॉटेल, आदमापूर येथे भुदरगड - राधानगरी आणि कागल विधानसभा मतदारसंघांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

त्यानंतर, दुपारी २.३० वाजता दिगंबर जैन बोर्डिंग मल्टिपर्पज हॉल, कोल्हापूर येथे कोल्हापूर उत्तर आणि करवीर या विधानसभा मतदारसंघांच्या आढावा बैठकीचे आयोजन होणार आहे. दुपारी ४.३० वाजता अभिषेक लॉन, ब्रम्हपुरी, कोल्हापूर येथे 'लाडकी बहीण भेट' या महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी ६.०० वाजता महेश क्लब, इचलकरंजी येथे हातकणंगले-इचलकरंजी आणि शिरोळ या विधानसभा मतदारसंघांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.


शिवसेना पक्षाचे संसदीय गटनेते खासदार श्रीकांत शिंदे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर