बातम्या

'एक देश, एक निवडणूक' विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, संसदेत वादळी चर्चा अपेक्षित

stormy debate expected in Parliament


By nisha patil - 12/12/2024 11:12:57 PM
Share This News:



'एक देश, एक निवडणूक' विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, संसदेत वादळी चर्चा अपेक्षित

भारतीय राजकारणातील महत्त्वाचा मुद्दा ठरलेल्या 'एक देश, एक निवडणूक' (One Nation, One Election) विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील समितीने या विधेयकाच्या बाजूने अहवाल सादर केला होता. यंदाच्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मांडले जाईल, अशी अपेक्षा आहे.

भाजपच्या दृष्टिकोनातून हे विधेयक अत्यंत महत्त्वाकांक्षी असून, त्याच्या मंजुरीसाठी सत्ताधारी एनडीए आघाडी विशेष प्रयत्न करेल. मात्र, इंडिया आघाडीचा याला तीव्र विरोध असल्याने विधेयकाला सहज मंजुरी मिळेल, अशी शक्यता कमी आहे. विरोध झाल्यास विधेयक संसदेच्या स्थायी समितीकडे पाठवले जाऊ शकते.

'एक देश, एक निवडणूक' विधेयक मंजूर झाले तरी त्याची अंमलबजावणी 2029 पासूनच होईल. या विधेयकावर संसदेत वादळी चर्चा होणार असल्याचे स्पष्ट आहे, तर काँग्रेस व इंडिया आघाडीतील घटकपक्ष यावर काय भूमिका घेतात, हे महत्त्वाचे ठरेल.


'एक देश, एक निवडणूक' विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, संसदेत वादळी चर्चा अपेक्षित