बातम्या

 महापुरामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याने शेतकरी वर्गावर मोठं संकट

suside of fammer


By Administrator - 8/19/2024 5:43:48 PM
Share This News:



 महापुरामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याने शेतकरी वर्गावर मोठं संकट;

तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी-राजू शेट्टी

 

शिरोळ :2021 च्या महापूरामुळे झालेले अगणित नुकसान, वाढलेली महागाई, आणि भाजीपाल्याचे गडगडलेले दर यांनी शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट बनवली आहे. साखर कारखान्यांकडून दुसऱ्या हप्त्यासाठी होणारी दिरंगाई आणि आता 2024 च्या महापूरात झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

याचा गंभीर परिणाम म्हणून, विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची समस्या आता पश्चिम महाराष्ट्रात आणि विशेषतः शिरोळ तालुक्यात पोहोचली आहे. शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील कुमार बाबू पवार यांनी बँकेच्या कर्जाचा बोजा आणि महापुरामुळे झालेल्या शेतीतील नुकसानामुळे व्यथित होऊन आपल्या शिरढोण येथील शेतात आत्महत्या केली.

या दुर्दैवी घटनेला केंद्र आणि राज्य सरकारचे धोरण जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 2021 च्या महापूरात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुरग्रस्तांची फसवणूक केल्याचा आरोप आहे, आणि आता एकनाथ शिंदे सरकारने शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवले आहे. 

राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, यांनी मागणी केली आहे की राज्य सरकारने 2019 प्रमाणे तातडीने पुरग्रस्तांना मदत जाहीर करावी, जेणेकरून शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त होण्यापासून रोखता येईल.


 महापुरामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याने शेतकरी वर्गावर मोठं संकट;