शैक्षणिक

‘स्वप्नवेल’ आणि ‘संजीवन’ कवितासंग्रहाचे प्रकाशन सोहळा ८ फेब्रुवारीला...

swapnavel and sanjivan


By nisha patil - 7/2/2025 6:15:57 PM
Share This News:



कोल्हापूर : येथील गोपाळ कृष्ण गोखले कॉलेजमधील उपप्राचार्य प्रा. एन. टी. पाटील (मोहन पाटील) लिखित ‘स्वप्नवेल’ आणि प्रा. एम. एम. कांबळे (राजू पुणेकर) लिखित ‘संजीवन’ या कवितासंग्रहांचा प्रकाशन आणि रसिकार्पण सोहळा येत्या ८ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. कॉलेजमधील ‘शिक्षणमहर्षी प्राचार्य एम. आर. देसाई ग्रंथालयात’ सकाळी ११ वाजता हा विशेष कार्यक्रम पार पडणार आहे.

प्रा. पाटील आणि प्रा. कांबळे हे दोघेही गोपाळ कृष्ण गोखले कॉलेजमध्ये वरिष्ठ प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. प्रा. पाटील हे इंग्रजी विषयाचे, तर प्रा. कांबळे मराठी विषयाचे प्राध्यापक आहेत.

‘स्वप्नवेल’ (प्रा. पाटील) – या कवितासंग्रहातील कविता मानवी मनाच्या भावविश्वावर आधारित असून, प्रेमभावना आणि ग्रामीण संस्कृती यांचे सुंदर चित्रण यात आढळते. प्रा. पाटील हे १९८९ पासून गोखले कॉलेजमध्ये कार्यरत आहेत आणि ते पन्हाळा तालुक्यातील जाफळे गावचे रहिवासी आहेत.

‘संजीवन’ (प्रा. कांबळे) – या संग्रहात सामाजिक विषय, शेती आणि ग्रामीण जीवनाशी निगडीत कविता आहेत. १९९८ पासून गोखले कॉलेजमध्ये कार्यरत असलेले प्रा. कांबळे हे राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली गावचे रहिवासी आहेत.या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्षस्थान कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. बी. भुयेकर भूषविणार आहेत.

कवितासंग्रहाचे प्रकाशन पत्रकार निखील पंडितराव आणि शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रा. श्रीराम मोहिते यांच्या हस्ते होणार आहे.

कार्यक्रमाला शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. जयकुमार देसाई, संस्थेच्या चेअरमन प्रा. डॉ. मंजिरी मोरे, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलत देसाई, प्रशासन अधिकारी पृथ्वी मोरे, माजी नगरसेवक अजित मोरे, कौन्सिल सदस्य प्रा. पी. बी. झावरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.


प्रा. पाटील आणि प्रा. कांबळे यांची ही पहिलीच साहित्यकृती असून, त्यांच्या कवितांमधून वेगवेगळ्या जीवनप्रवाहांचे प्रतिबिंब उमटते. या कवितासंग्रहांचे प्रकाशन हे साहित्य रसिकांसाठी विशेष पर्वणी ठरणार आहे.


‘स्वप्नवेल’ आणि ‘संजीवन’ कवितासंग्रहाचे प्रकाशन सोहळा ८ फेब्रुवारीला...
Total Views: 81