राजकीय
ऋतुराज पाटील यांच्या विजयासाठी एक दिलाने काम करूया - शारंगधर देशमुख
By Administrator - 11/13/2024 5:22:51 PM
Share This News:
कोल्हापूर, ता.13 : आमदार ऋतुराज पाटील यांना आमदार करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करूया असे आवाहन माजी नगरसेवक शारंगधर देशमुख यांनी केले. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीमधील काँग्रेसचे उमेदवार आ.ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ सानेगुरुजी वसाहतीमध्ये आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याला आमदार सतेज पाटील, आ.ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
देशमुख पुढे म्हणाले, आपण सर्व आमदार सतेज पाटील यांच्या विचाराने काम करत आहे. आ.ऋतुराज पाटील यांनी केलेली कोट्यवधींची विकासकामे लोकांपर्यंत पोहाचवून त्यांच्या विजयासाठी कामाला लागावे.
आमदार सतेज पाटील म्हणाले, संघर्षाच्या जोरावरच कार्यकर्त्यांची फळी उभी केली आहे. कार्यकर्ते हेच माझे कुटुंब असून, आपले घर अभेद्य ठेवूया.
आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, गेली पाच वर्ष कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळे विकासाभिमुख काम केले आहे. शारंगधर देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांचा विश्वास व बळ आपल्या पाठीशी कायम राहिले आहे
प्राचार्य जे. के. पवार म्हणाले, आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या पाठीशी जनता निश्चित उभी राहणार आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते बापू तराळ, भाजपचे कार्यकर्ते कुलदीप सावळकर, कुमार चौगले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
जे. के. कांबळे, सदानंद कवडे यांनी मनोगत व्यक्त केले. माजी नगरसेवक भरत लोखंडे, अभिजित चव्हाण, शिवाजी मोरे, सुरेश देशमुख, राजशेखर तंबाके, उदय सासणे, युवराज तेली, अभिजित खतकर, रमेश चावरे, भिकाजी गावकर, सुधीर रावळ, किरण पाटील, नंदकुमार पिसे, गणपतराव मुळीक, सुयोग मगदुम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
ऋतुराज पाटील यांच्या विजयासाठी एक दिलाने काम करूया - शारंगधर देशमुख
|