बातम्या
*श्रद्धा इन्स्टिट्यूटने रचला नवा इतिहास: यश पोतदार महाराष्ट्रात पहिला*
By Administrator - 2/9/2024 6:14:49 PM
Share This News:
*श्रद्धा इन्स्टिट्यूटने रचला नवा इतिहास: यश पोतदार महाराष्ट्रात पहिला*
इचलकरंजी येथील श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंटने नीट 2024 परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे. सूक्ष्म अभ्यास व नवीन उपक्रमांच्या जोरावर सामान्य विद्यार्थ्यांचे मेडिकल व इंजिनिअरिंगचे स्वप्न साकार करण्यासाठी श्रद्धा इन्स्टिट्यूटने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या यशाने संस्थेचा पश्चिम महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगण्य महाब्रँड म्हणून लौकिक प्रस्थापित झाला आहे.
नीट 2024 परीक्षेत इन्स्टिट्यूटचे तीन विद्यार्थ्यांनी (यश पोतदार 720 पैकी 715 गुण, अथर्व हावळ 720 पैकी 705 गुण, सर्वेश दोरुगडे 720 पैकी 705 गुण) संस्थेच्या इतिहासातील सर्वोत्तम निकाल नोंदवला आहे. विशेषतः, यश पोतदार याने ऑल इंडिया रँक 109 मिळवून, महाराष्ट्रातून पहिला येण्याचा मान पटकावला आहे. त्याचा कॅटेगिरी नुसार देशातील 30 वा क्रमांक आहे.
इचलकरंजी सारख्या लहानशा शहरातून उदयास आलेल्या श्रद्धा इन्स्टिट्यूटने शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. श्रद्धा इन्स्टिट्यूटने केवळ शहरी भागातीलच नव्हे, तर खेडोपाड्यातील विद्यार्थ्यांच्या मेडिकल आणि इंजिनिअरिंग प्रवेशासाठी एक मार्गदर्शक संस्थेचे रूप धारण केले आहे. कोणतीही शाखा नसताना, एका शाखेतून इतक्या मोठ्या प्रमाणात निकाल देणारी श्रद्धा इन्स्टिट्यूट महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था म्हणून उदयास आली आहे.
या यशामागे संस्थेच्या मॅनेजमेंटची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मेहनत, सातत्य, चिकाटी, जिद्द, विश्वास यांसारखी मूल्ये संस्थेतील प्रत्येक व्यक्तीने आत्मसात केली आहेत. कडक शिस्त, नियोजन, विशिष्ट क्लुप्त्या, सराव यांच्या जोरावर विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे. तज्ञ प्राध्यापक वर्ग, उत्कृष्ट व्यवस्थापन, पालकांचा दृढ विश्वास, व विद्यार्थ्यांचे अपार कष्ट यामुळे संस्थेचा पाया अधिक भक्कम होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून श्रद्धा इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्याचा कल वाढत असल्याने, ही संस्था संशोधनाचा विषय ठरली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष श्री. ए. आर. तांबे, समन्वयक श्री. एम. एस. पाटील, सौ. सुप्रिया कौंदाडे, सौ. संगीता पवार, श्री. अभिषेक तांबे, व सौ. सृष्टी तांबे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
*श्रद्धा इन्स्टिट्यूटने रचला नवा इतिहास: यश पोतदार महाराष्ट्रात पहिला*
|