बातम्या

दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने 11 लाखांची फसवणूक

11 lakh fraud on the pretext of buying jewellery


By nisha patil - 2/24/2025 9:44:28 PM
Share This News:



दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने 11 लाखांची फसवणूक

सुभाष नगर येथील महिलेस अटक

राजारामपुरी परिसरातील महिलांची ओळख काढून त्यांना भुरळ घालून सोने लंपास करणाऱ्या सुभाषनगर इथल्या जयश्री मोहन माजगावकर या महिलेला राजारामपुरी पोलिसांनी अटक केलीय.याबाबत सम्राटनगर, सरनाईक माळ इथल्या  ऐश्वर्या मृणाल माने यांनी फिर्याद दिली होती.त्यांची आरोपी महिलेने 10 लाख 90 हजारांची फसवणूक केली होती.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की , संशयीत आरोपी जयश्री माजगावकर ही राजारामपुरीसह परिसरातील महिलांची ओळख काढायची. त्यांना भुरळ घालून फसवणूक करायची. फिर्यादी माने यांनाही तिने विश्वासात घेऊन दागिने खरेदी करणार आहोत. त्यापैकी काही दागिने देण्याचे आमिष दाखविले.त्यांच्याकडून 9 तोळ्याचे दागिने व महागडा मोबाईल काढून घेतला. शिवाय वेळोवेळी 3 लाख 30 हजार रुपयेही महिलेकडून उकळण्यात आले. 14 डिसेंबर 2023 ते 18 फेब्रुवारी 2025 अखेर महिलेने एकूण 10 लाख 90 हजाराची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तक्रार दाखल होताच राजारामपुरी पोलिसांनी संशयित महिलेला तत्काळ अटक केली आहे.


दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने 11 लाखांची फसवणूक
Total Views: 50