बातम्या

हातकणंगले तालूक्यातील हेरले येथील शेतकर्‍याची कर्जाला कंटाळून आत्महत्या

A farmer from Herle in Hatkanangle taluka committed suicide due to debt


By nisha patil - 6/28/2024 7:55:55 PM
Share This News:



 सेवा संस्थेच्या व खासगी सावकाराच्या कर्जाला कंटाळून  हातकणंगले तालूक्यातील  हेरले गावातील शेतकरी सिकंदर बाजीराव  खतीब ( वय  55) यांने आपल्या  राहात्या घरी लोखंङी अँगलला  दोरी बांधून आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी दहा वाजण्याच्या सूमारास घङली.
 

  याबाबत अधिक माहीती अशी की"" मयत सिकंदर खतीब याचे हेरले गावातील बारगीर गल्लीत  पिण्याच्या पाण्याच्या तळ्याजवळ घर आहे. गावातील एका संस्थेत त्यांने  50 हजारूपयांचे कर्ज घेतले होते. तसेच त्यांनी काही सावकाराकङून एक लाख रूपयांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज देता येत नसल्याने  त्याने आज आपल्या राहात्या घरातील खोलीमध्ये लोखंङी अँगलला दोरी बांधून आत्महत्या केली.त्याच्या पत्नी त्यांच्या खोलिमध्ये गेल्या असता  पत्नी गळफास लावून घेतल्याचे समझले. तिने ओरङाओङ केल्यानंतर  त्यांच्या नातेवाईकांनी  त्याचा गळफास काङून त्याला उपचारासाठी कोल्हापूरच्या शासकीय रूग्णालयात  घेवून जात असतानां उपचारापूर्वीच त्याचा मूत्यू झाला. सी.पी.आर रूग्णालयात त्याचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याचा मूतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
त्याच्या पश्चात पत्नी""एक मूलगा""एक मूलगी असा परिवार आहे.


हातकणंगले तालूक्यातील हेरले येथील शेतकर्‍याची कर्जाला कंटाळून आत्महत्या