बातम्या

कणाननगर परिसरातील युवकाचा काठी दगडाने ठेचून खून ; कोल्हापुरात खून सत्र कायम

A youth in Kanannagar area was killed by crushing a stick with a stone


By nisha patil - 2/7/2024 7:42:06 PM
Share This News:



कोल्हापुरात: खून सत्र कायम असल्याच दिसून येतंय.कनान नगरमधील युवकाचा काठी आणि दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची  घटना आज दुपारी एकच्या सुमारास घडलीये. पंकज भोसले असं खून झालेल्या युवकाच नाव आहे.राजारामपुरी येथील दीपा गॅस एजन्सी जवळ हा सर्व प्रकार घडलाय. त्यामुळे राजारामपुरी परिसरात मोठी खळबळ उडालीये.

शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके, राजारामपुरी पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. पोलिसांकडून पंचनामा करण्याचं काम सुरू आहे. कनाननगर परिसरात राहणाऱ्या तरुणांनीच हा  हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आलीये.


कणाननगर परिसरातील युवकाचा काठी दगडाने ठेचून खून ; कोल्हापुरात खून सत्र कायम