पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरुणास अटक

A youth who was walking around with a pistol was arrested


By nisha patil -
Share This News:



पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एका  तरुणाला सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलय . अलपक राजकुमार कांबळे अस या संशयित तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून ५० हजार रूपये किमतीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहे.स्थनिक गुन्हे अन्वेषण पथक कवठेमहांकाळ परिसरात गस्तीवर असताना  बेळंकी-कुकटोळी मार्गावरील हनुमान खिंड परिसरात संशयित कांबळे कमरेला पिस्तूल लावून फिरत असल्याची माहिती मिळाली. पथकाने त्याठीकणी जाऊन त्याला ताब्यात घेत झडती घेतली असता, कांबळे याच्याकडे पिस्तूल मिळाले. त्याने हे पिस्तूल सुमित धेंडे याच्याकडून घेतल्याचे पोलिसांना सांगितले. कांबळे याच्याकडून ५० हजार रूपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे आणि दुचाकी असा ८१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.कवठेमहांकाळ पोलिसात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय कांबळे, दीपक गायकवाड, हेमंत ओमासे, संदीप नलावडे आदींच्या पथकाने ही कारवाई केलीय.


पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरुणास अटक
Total Views: 32