बातम्या
कंदलगांव येथे सुरु होत असलेल्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु
By nisha patil - 4/7/2024 7:56:19 PM
Share This News:
इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत जिल्ह्यामध्ये इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुलांसाठी एक व मुलींसाठी एक अशी दोन वसतिगृहे कंदलगांव, कोल्हापूर या ठिकाणी सुरु होत आहेत. सन 2024-25 करीता इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाच्या प्रवेश प्रक्रीयेच्या वेळापत्रकास शासन स्तरावरुन मान्यता देण्यात आली असून वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.
शासकीय वसतिगृहाचे सन 2024-25 साठीचे प्रवेशाचे वेळापत्रक -
उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी- ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी- 1 जुलै ते 21 जुलै 2024, पहिली निवड यादी गुणवत्तेनुसार अंतिम करणे व प्रसिध्द करणे- 30 जुलै 2024, पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतीम मुदत- 10 ऑगस्ट 2024, रिक्त जागेवर दुसऱ्या प्रतिक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी प्रसिध्द करणे- 16 ऑगस्ट 2024 व दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे- 20 ऑगस्ट 2024
वसतिगृहाच्या प्रवेशाबाबत अधिक माहितीसाठी भिकाजी कांबळे 9765152409 व शोएब नालबंद 8806551423 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक श्रीमती सुनिता नेर्लीकर यांनी केले आहे.
कंदलगांव येथे सुरु होत असलेल्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु
|