राजकीय

कोल्हापूर दक्षिणमध्ये अमल महाडिक यांची विजयी पताका...

Amal Mahadiks victory flag in Kolhapur South


By nisha patil - 11/23/2024 12:10:51 PM
Share This News:



कोल्हापूर दक्षिणमध्ये अमल महाडिक यांची विजयी पताका...

ऋतुराज पाटील यांना धोबीपछाड

 कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांनी काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांचा पराभव करत विजयी पताका फडकावली आहे. दुसऱ्या फेरीपासूनच आघाडी घेतलेल्या महाडिक यांनी तिसऱ्या फेरीपासून ही आघाडी अधिक मजबूत केली आणि शेवटच्या फेरीपर्यंत निर्विवाद वर्चस्व राखले.

ऋतुराज पाटील यांची लोकप्रियता आणि विकासकामांवर भर असतानाही अमल महाडिक यांनी जोरदार रणनीती आणि प्रभावी जनसंपर्क मोहिमेद्वारे या निवडणुकीत बाजी मारली. महाडिक यांच्या विजयाने कोल्हापूर दक्षिणच्या राजकीय समीकरणात मोठा बदल घडला असून, भाजपने या मतदारसंघात आपली ताकद दाखवून दिली आहे.

या विजयामुळे महाडिक गटाचा प्रभाव वाढला असून, मतदारसंघात नव्या राजकीय समीकरणांची नांदी झाली आहे.


कोल्हापूर दक्षिणमध्ये अमल महाडिक यांची विजयी पताका...