राजकीय

राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का

Another big blow to NCP


By surekha -
Share This News:



राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे  अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा  केल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बरीच उलथापालथ पाहायला मिळत आहे. शरद पवारांनी ही घोषणा केल्यापासून नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. अशातच काही पदाधिकाऱ्यांनी कालच आपल्या पदाचा राजीनामा दिले आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक झटका बसला आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि पवारांच्या अत्यंत जवळचे समजले जाणारे जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 
शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी आग्रही मागणी जितेंद्र आव्हाड हे कालपासून करत आहेत. त्याचे पडसादही आता उमटू लागले आहेत. कारण ठाण्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आता राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी देखील पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे.शरद पवार यांनीच अध्यक्षपदी कायम राहावं अशी जितेंद्र आव्हाड यांची इच्छा आहे. त्यासाठीच त्यांनी हा राजीनामा दिल्याचं आता समोर आलं आहे. त्याच्या या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीत राजीनामा सत्राला सुरुवात झाली आहे.


Another big blow to NCP