बातम्या

पुण्यात ‘जीबीएस’ व्हायरचे प्रमाण वाढत असल्याने आढावा बैठकीचे आयोजन....

As the amount of GBS virus is increasing in Pune


By nisha patil - 1/28/2025 2:56:54 PM
Share This News:



  पुण्यात ‘जीबीएस’ व्हायरचे प्रमाण वाढत असल्याने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. या रोगाची लक्षणे आढळल्यास रुग्णालयात दाखल होण्यासाठी आवाहन तसेच जनजागृती करणे, उपाययोजना कराव्यात असे निर्देश ना. प्रकाश आबिटकारांनी दिले. तसेच आजारातून बरे होण्याचे प्रमाण मोठे असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन केले.

पाणी उकळून पिणे, स्वत:ची रोग प्रतिकार क्षमता वाढविणे तसेच स्वच्छ पाण्याचा आग्रह धरणे या उपाययोजना महत्त्वाच्या असून त्याबाबत जनजागृती करावी. या आजाराचे आजअखेर 111 आणि आज पासून रुग्णालयाने कळविल्याप्रमाणे 10 संशयित रुग्ण आढळले आहेत. बाटलीबंद पाण्याचे नमुने अन्न व औषध प्रशासन विभागाने तपासावेत.

जारमधून विकल्या जाणाऱ्या पाण्याची महानगरपालिकांच्या आरोग्य विभागाने तपासणी करावी, अशाही सूचना यावेळी देण्यात आल्या. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले, पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोराडे, आदी उपस्थित होते.


पुण्यात ‘जीबीएस’ व्हायरचे प्रमाण वाढत असल्याने आढावा बैठकीचे आयोजन....
Total Views: 44