बातम्या

सलमान खानच्या सिकंदर चित्रपटात बाहुबली फेम सत्यराज झळकणार

Baahubali fame Satyaraj will be seen in Salman Khans Sikandar


By nisha patil - 5/7/2024 7:12:38 PM
Share This News:



बॉलीवूड अभिनेता सलमान खानने काही दिवसांपूर्वी चाहत्यांसोबत आगामी चित्रपटातील लूक शेअर केला होता. भाईजानने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरुन 'सिकंदर' चित्रपटातील कूल लूक शेअर केला होता. सलमान खानने फर्स्ट लूकचा फोटो शेअर केल्यापासून चाहत्यांच्या मनातील या चित्रपटासाठीची उत्सुकता आणखी वाढली आहे. सिकंदर चित्रपट ईदच्या दिवशी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या आगामी 'सिकंदर' चित्रपटामध्ये व्यस्त आहे. भाईजानचे चाहते सलमान खानच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर समोर आलं होतं. सलमान खानने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून चित्रपटाची शूटींग सुरु झाल्याचं सांगितलं होतं. यानंतर चाहत्यांची उत्कंठा शिगला पोहोचली आहे. अशातच आता या चित्रपटात 'बाहुबली'  फेम अभिनेत्याची एन्ट्री झाल्याची मोठी अपडेट समोर आली आहे.


सलमान खानच्या सिकंदर चित्रपटात बाहुबली फेम सत्यराज झळकणार