बातम्या
"बेळगाव जिल्ह्यातील कृषी प्रदर्शनात स्वप्निलदादा आवाडे यांची उपस्थिती"
By nisha patil - 10/4/2025 6:45:02 PM
Share This News:
"बेळगाव जिल्ह्यातील कृषी प्रदर्शनात स्वप्निलदादा आवाडे यांची उपस्थिती"
श्री हालसिद्धीनाथ सहकारी साखर कारखाना लि. निपाणी येथे माजी खासादर आण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांच्या संकल्पनेतून बेळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
या कृषी उत्सवास क आवाडे इचलकरंजी जनता सह बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे यांनी उपस्थिती दर्शवली आणि शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी डॉ. कृष्णा भट्ट यांचे पशुपालन या विषयावर मार्गदर्शन झाले. या कार्यक्रमाप्रसंगी आयोजक माजी खासदार आण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते स्वप्निलदादांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार अशोकराव माने, श्री हालसिद्धीनाथ सहकारी साखर कारखानाचे चेअरमन एम पी पाटील, व्हा चेअरमन पवन पाटील, संचालक शरद जंगटे, निपाणी नगराध्यक्षा सोनल कोठाडीया, हुपरीच्या नगराध्यक्षा सौ जयश्री गाट, दिलीप खोत, श्रेणिक मगदूम, कोतवाल सर यांच्यासह कारखान्याचे सर्व पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"बेळगाव जिल्ह्यातील कृषी प्रदर्शनात स्वप्निलदादा आवाडे यांची उपस्थिती"
|