राजकीय

राष्ट्रवादी काँग्रेसला भिवंडी येथे मोठा झटका ?

Big blow to NCP Congress in Bhiwandi


By nisha patil - 6/27/2023 1:26:44 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम :   मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला भिवंडी येथे मोठा झटका बसला आहे. भिवंडी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा आदेश डावलून पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात मतदान करणारे १८ नगरसेवक सहा वर्षांसाठी अपात्र ठरले आहेत
भिवंडीचे माजी महापौर जावेद दळवी यांच्या याचिकेवर नगरविकास विभागाने हा निर्णय दिला आहे. या नगरसेवकांनी काँग्रेस पक्षाच्या महापौरपदाच्या उमेदवार रिषीका रांका यांच्या विरोधात मतदान केले होते व त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. काँग्रेस पक्षाने त्यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. त्यानंतर हा निर्णय देण्यात आला आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसला भिवंडी येथे मोठा झटका ?