बातम्या

चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या पक्षाने आम्हाला विश्वासघाताचे विषारी घोट पाजले

Chandrakant Patil and his party fed us the poison of betrayal


By nisha patil - 6/27/2024 8:04:30 PM
Share This News:



चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षनेत्यांना एक  चॉकलेट दिले तसेच अनिल परबांना अॅडव्हान्स शुभेच्छा दिल्या, यावर सुषमा अंधारे म्हणाल्या,   चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या पक्षाने आम्हाला विश्वासघाताचे विषारी घोट पाजले आहेत. हे विश्वासघाताचे विषारी घोट सुद्धा पचवून आम्ही परत उभा राहिलो आहे. माध्यमांच्या समोर जरी चंद्रकांत पाटील यांनी चॉकलेट दिले असले तरी आमची त्यांना विनंती आहे की,  जनतेला आश्वासनांचे चॉकलेट देऊ नका.   तुमच्या अशा चॉकलेटनी आम्ही तुम्हाला जनतेच्या समस्यांबाबत प्रश्न विचारणार नाही या भ्रमात राहू नका. मेरा यार मेरा दुश्मन हा चित्रपट पुन्हा एकदा बघून घ्या याचा काहीही परिणाम होणार नाही पुढे त्या म्हणाल्या,  उद्धव साहेबांना एका ताटात जरी घेऊन फडणवीस जेवले तरी आम्ही फडणवीस यांच्या नावावर आता फुली मारली आहे,   म्हणजे विषय संपला आहे. एकत्र येणार वगैरे काहीही असं नाही. योगायोगाने आपल्याकडे लिफ्ट पाच-पन्नास नाही त्यामुळे एकाच लिफ्टमधून ते गेले की याचा अर्थ लगेच एकत्र आले असा होत  नाही.


चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या पक्षाने आम्हाला विश्वासघाताचे विषारी घोट पाजले