विशेष बातम्या

देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा

Devendra Fadnavis should resign as Home Minister


By nisha patil - 3/3/2025 3:03:23 PM
Share This News:



देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा

वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

महाराष्ट्रात अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. अवैध धंदे,खून,खंडणी विनयभंग महापुरुषांची विटंबना होत आहे.मात्र अशा घटनांबाबत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कठोर पावले उचलली जात नाहीत. 

त्यामुळे  देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी माथाडी ट्रान्सपोर्ट, जनरल युनियन कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. राज्यातील त्रिशंकू सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

आंदोलनाप्रसंगी संभाजी कागलकर, रघुनाथ कांबळे, प्रभाकर माने, देवेंद्र कांबळे, राजकुमार कांबळे रावसाहेब मुंजारे, संगीतात थोरात सुहासिनी माने, यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा
Total Views: 29