विशेष बातम्या
शेतकऱ्यांवर जलमापक यंत्राची सक्ती करू नका – सतेज पाटील
By nisha patil - 4/3/2025 10:13:03 PM
Share This News:
शेतकऱ्यांवर जलमापक यंत्राची सक्ती करू नका – सतेज पाटील
कोल्हापूर : कृषी पंपांना जलमापक यंत्र बसवण्याच्या सक्तीच्या आदेशाला विरोध करत आ. सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत हा आदेश रद्द करण्याची मागणी केली.
शासनाने २०२१ मध्ये प्रवाही सिंचनाचा दर लागू केला असतानाही जलसंपत्ती प्राधिकरणाने जलमापक यंत्र बसवण्याचा निर्णय घेतला. यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असून, त्यांना दहा पटीने अधिक दर भरावा लागणार आहे.
महापुराच्या समस्यांमुळे शेतकऱ्यांची मोटरे टिकत नाहीत, त्यामुळे हा आदेश अन्यायकारक आहे, असे मतही त्यांनी मांडले.
यावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सध्या जलमापक यंत्र सक्तीला स्थगिती देण्यात आल्याचे स्पष्ट केले.
शेतकऱ्यांवर जलमापक यंत्राची सक्ती करू नका – सतेज पाटील
|