‘त्या’ वसंता दुपारेला ‘फाशी’च!: राष्ट्रपतीकडे केली दया याचिका
By nisha patil -
Share This News:
नागपूरच्या वाडी परिसरातील चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून निघृण हत्या करण्यात आली होती. या बलात्कार आणि हत्येप्रकरणी नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने वसंता दुपारे याला फाशीची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणी आरोपीने राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्याकडे दया याचिका केली होती. ही याचिका आता फेटाळून लावण्यात आली आहे, त्यामुळे आता आरोपी वसंता दुपारेला फासावर लटकवण्यात येणार आहे.
वसंता दुपारी याने 3 एप्रिल 2008 रोजी त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या बालिकेसोबत अत्याचार करून तिची दगडाने ठेचून क्रूर हत्या केली होती. या प्रकरणात त्याला 2010 साली नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने देखील फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. त्यानंतर वसंत दुपारेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र 2014 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने देखील त्याची याचिका फेटाळली होती. तसेच 3 मे 2017 रोजी त्याची सुप्रीम कोर्टात पुनर्विलोकन याचिका देखील फेटाळत त्याच्याविरुद्ध न्यायालयाने संताप व्यक्त केला होता.या घटनेत सुटकेचा अखेरचा पर्याय म्हणून वसंत दूपारे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडे दया याचिकेची मागणी केली होती. या प्रकरणात राष्ट्रपती सचिवालय यांनी 28 मार्च रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून अभिप्राय प्राप्त झाला होता. क्रूर वसंता याच्या कृत्यामुळे समाजावर झालेला आघात पाहता राष्ट्रपती दौपदी मुर्मु यांनी वसंताची दया याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे त्याला फाशी होणार हे आता स्पष्ट झाले आहे.
‘त्या’ वसंता दुपारेला ‘फाशी’च!: राष्ट्रपतीकडे केली दया याचिका
|