बातम्या
शेतकऱ्यांनी नाविन्यपुर्ण पध्दतींचा अवलंब करुन समृध्द व्हावे - जिल्हाधिकारी अमोल येडगे
By nisha patil - 2/7/2024 7:35:49 PM
Share This News:
कृषी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी नाविन्यपुर्ण पध्दतींचा अवलंब करुन समृध्द शेतकरी व्हावे व भारतीय अर्थव्यवस्थेत योगदान वाढविण्यासाठी कटिबध्द रहावे , असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
जिल्हा परिषद व कृषी विभाग, पंचायत समिती, करवीर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व हरीत क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीत कृषी दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, सहयोगी संशेाधन संचालक,शेंडा पार्क डॉ.अशोककुमार पिसाळ, जिल्हा पशुसंर्वधन उपायुक्त डॉ. सुरेंद्र भरते, किटकशास्त्र विभागाचे सहा.प्राध्यापक डॉ.अभयकुमार बागडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अजय कुलकर्णी व सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते स्व. वसंतराव नाईक यांचे प्रतिमा पुजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. मान्यवरांचे स्वागत आंब्याची रोपे देऊन करण्यात आले. कृषी क्षेत्रातील नाविन्यपुर्ण योजनांतंर्गत विविध स्तरावरील पुरस्कार विजेते शेतकरी व आदर्श गोठा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्र व आंब्याचे रोप देऊन गौरव करण्यात आला .
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपस्थित शेतक-यांना कृषी दिन, डॉक्टर दिन व चार्टड अकौंटंट दिनानिमित्त शुभेच्छा देवून कै.वंसतरावजी नाईक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व हरीत क्रांतीचे प्रणेते व पंचायत राज व्यवस्थेचे प्रणेते असून त्यांच्या पावन नगरीत काम करण्याची संधी लाभल्याचे त्यांनी नमुद केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी उपस्थित पुरस्कार विजेत्या शेतक-यांना शुभेच्छा देऊन आपल्या शेतक-यांकडे रोल मॉडेल म्हणून बघावे, असे सांगितले.
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.प्रमोद बाबर यांनी पशुपालन हा मुख्य व्यवसाय म्हणून पाहण्यासाठी नाविन्यपुर्ण पशुधनांची निवड, निगा, वेळेवर करावयाचे लसीकरण, सकस आहार, मिल्किंग मशिनचा वापर, मुरघास या तंत्रज्ञानाचा वापर करुन एक वेगळी ओळख निर्माण करण्याकामी शेतक-यांना प्रोत्साहित केले.
डॉ.पिसाळ यांनी उपस्थितांना कृषी दिनाच्या शुभेच्छा देऊन ऊस पीक व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
डॉ. बागडे यांनी चालु आर्थिक वर्षात जिल्हा स्तरावरुन राबविण्यात येणा-या मधुमक्षिका पालन योजनेबद्दल मार्गदर्शन केले.
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. कुलकर्णी यांनी कृषि विभागाकडील विविध योजनांची माहिती देऊन जास्तीत जास्त शेतक-यांनी एक रुपयाच्या पीक विम्याचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी अभयकुमार चव्हाण यांनी वसंतराव नाईक यांच्या जीवन चरित्रावर व त्यांच्या शेती विषयक कार्यावर प्रकाश टाकुन केले.
कृषी अधिकारी गौरी मठपती यांनी बांधावरच्या शेतक-यांना समजेल अशा ओघवत्या भाषा शैलीत कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.
मोहीम अधिकारी तानाजी पाटील यांनी उपस्थित शेतक-यांना माती परिक्षणाचे महत्व व माती नमुना घेताना घ्यावयाची काळजी व त्या प्रमाणे वापरावयाची खते व नॅनो युरिया व डीएपीचा वापर याबद्दल माहिती विषद करुन मान्यवर व पुरस्कार विजेते शेतकऱ्यांचे आभार मानले.
शेतकऱ्यांनी नाविन्यपुर्ण पध्दतींचा अवलंब करुन समृध्द व्हावे - जिल्हाधिकारी अमोल येडगे
|