बातम्या
केंद्रीय अर्थसंकल्पातून सामान्य माणसाच्या अपेक्षांची पूर्तता, खासदार धनंजय महाडिक
By nisha patil - 1/2/2025 6:48:40 PM
Share This News:
केंद्रीय अर्थसंकल्पातून सामान्य माणसाच्या अपेक्षांची पूर्तता, खासदार धनंजय महाडिक
खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत करत, अर्थमंत्री निर्मला सीतारमन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असून, सामान्य माणसाच्या अपेक्षांची पूर्तता करणारा आणि विकसित भारताच्या पायाभरणीसाठी गती देणारा आहे.
१२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केल्यामुळे मध्यमवर्गीयांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडीट कार्डची मर्यादा ५ लाख करण्याचा निर्णय आणि गंभीर आजारांवरील जीवनावश्यक औषधांवरील सीमा शुल्क माफी, या सुधारणांमुळे सामान्य जनतेला लाभ होणार आहे. महाराष्ट्रासाठी पायाभूत प्रकल्पांसाठी भरीव निधीचा ठराव करण्यात आल्याने त्याला मोठा फायदा होईल.
केंद्रीय अर्थसंकल्पातून सामान्य माणसाच्या अपेक्षांची पूर्तता, खासदार धनंजय महाडिक
|