बातम्या
आम.छगन भुजबळ यांना मंञी मंडळात स्थान द्या !
By nisha patil - 12/27/2024 10:12:16 PM
Share This News:
आम.छगन भुजबळ यांना मंञी मंडळात स्थान द्या !
विणकर सेवा संघटनेची रॅलीव्दारे मागणी
इचलकरंजी / प्रतिनिधी ओबीसी समाजाचे नेते माजी मंत्री व आमदार छगन भुजबळ यांना मंञी मंडळात स्थान देऊन महायुती सरकारने त्यांचा योग्य सन्मान करावा ,अशी मागणी इचलकरंजीत विणकर सेवा संघटनेच्या वतीने रॅली व्दारे मोठ्या घोषणा देत करण्यात आली.
नव्या महायुती राज्य सरकारच्या मंञी मंडळात आम.छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्याने याचे संतप्त पडसाद राज्यभर ओबीसी समाजातून संतप्त पडसाद उमटत आहेत.याच अनुषंगाने इचलकरंजी येथे विणकर सेवा संघटनेच्या वतीने अण्णा रामगोंडा भाजी मार्केट परिसरात रॅली काढत घोषणा देत आमदार छगन भुजबळ यांना मंञी मंडळात स्थान देऊन महायुती सरकारने त्यांचा योग्य सन्मान करावा ,अशी मागणी महायुतीच्या राज्य सरकारकडे करण्यात आली.
यावेळी विणकर सेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुनील मेटे म्हणाले , ओबीसी समाजाचे नेते आमदार छगन भुजबळ यांचे राजकारण व समाजकारणात मोठे योगदान आहे.त्यांनी नेहमीच राज्यातील गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवला आहे.त्यामुळे नव्या महायुती राज्य सरकारच्या मंञी मंडळात त्यांना स्थान देऊन त्यांचा योग्य सन्मान करावा ,अशी समस्त ओबीसी समाज बांधवांची मागणी आहे.याबाबत नव्या महायुती सरकारने गांभीर्याने विचार करुन तातडीने निर्णय घेऊन ओबीसी समाज बांधवांना न्याय द्यावा ,अशी आग्रही मागणीही त्यांनी केली.
प्रारंभी,अण्णा रामगोंडा भाजी मार्केट परिसरातील प्रमुख मार्गावर घोषणा देत रॅली काढण्यात आली.
यावेळी विणकर सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल लाटणे , श्रीनिवास फुलपाटी ,दत्ता मांजरे ,अरुण जाधव , सुनील बारवाडे , श्रीमंत बागडे , सुनील कांबळे , विक्रांत ढवळे ,गीता कुरुंदवाडे ,रेखा हुनसिमरद , ज्योती लाटणे ,सुरेखा हुगार यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आम.छगन भुजबळ यांना मंञी मंडळात स्थान द्या !
|