बातम्या
राज्याचे वस्त्रोद्योग विभागाचे आयुक्त आयुष्यांत पांडा यांची सदिच्छा भेट...
By nisha patil - 6/27/2024 11:39:12 AM
Share This News:
महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग विभागाचे आयुक्त अविशांत पांडा (IAS) यांनी दि इचलकरंजी पॉवरलुम विव्हर्स को-ऑप. असोसिएशनला यंत्रमाग उद्योगातील अडचणी संदर्भात सदिच्छा भेट दिली याप्रसंगी मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांनी त्यांचे स्वागत करून त्यांच्यासमोर यंत्रमाग उद्योगातील प्रश्न मांडले व मिटिंग मध्ये यंत्रमाग उद्योगातील समस्या, अडचणी, ऑनलाईन रजिस्ट्रेशन या संदर्भात साहेबांनी त्यांच्याशी चर्चा झाली.
यावेळी वस्त्रउद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी पॉवरलूम असोसिएशनचे चेअरमन चंद्रकांत पाटील, पॉवरलूम असोसिएशनचे व्हा. चेअरमन रफिक खानापुरे, साधे माग संरक्षण समितीचे विश्वानाथ मेटे, एअरजेट असोसिएशनचे राजगोंड पाटील, कोल्हापूर जिल्हा पॉवरलुम असोसिएशनचे दिपक राशिनकर, यंत्रमागधारक जागृती संघटनेचे सुरज दुबे, संचालक सोमाण्णा वाळकुंजे, संचालक चंद्रकांत भोपळे, संचालक पांडूरंग सोलगे, संचालक सुभाष बलवान, संचालक दत्तात्रय टेके, संचालक किरण पोवार, संचालक राजाराम गिरी, संचालिका श्रीमती हमिदा गोरवाडे, संचालिका सौ. महादेवी खोत उपस्थित होते.
राज्याचे वस्त्रोद्योग विभागाचे आयुक्त आयुष्यांत पांडा यांची सदिच्छा भेट...
|