बातम्या
महिलांच्या निरोगी आरोग्य आणि सुखद जीवनासाठी 'हेल्थ फाॕर हर' उपक्रम राबविणार: नवोदिता घाटगे
By nisha patil - 3/7/2024 6:11:15 PM
Share This News:
महिलांच्या निरोगी आरोग्य आणि सुखद जीवनासाठी सामाजिक चळवळ म्हणून'हेल्थ फाॕर हर' ही मोहीम 7 जुलै पासून कागल तालुक्यातील हसुर खू ||येथून राबविण्यात येणार आहे.अशी माहिती राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्ष नवोदिता घाटगे यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिली आहे .
या मोहीमे बाबत माहिती देताना त्या, म्हणाल्या, जागतिक पातळीवर तसेच भारतामध्ये सध्या सर्वात जास्त भेडसावणाऱ्या धोक्यापैकी एक धोका म्हणजे स्त्रियांना होणारा स्तन कर्करोग व गर्भाशयाला होणारा कर्करोग. स्त्रियांच्या या महत्वपूर्ण आजारावर मात करण्यासाठी या मोहिमेचे आयोजन केले आहे. राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन ,राजमाता जिजाऊ महिला समिती कागल,तसेच या मोहिमेचे प्रमुख विवेक सुतार ,(सामाजिक अभिवक्ता)यांच्या संयुक्त विद्यमाने,ही मोहीम राबवली जाणार आहे
जागतिक पातळीवरील आरोग्य समित्या आणि संस्थांचे लेख वाचले, त्यांच्या अहवालाचा आढावा घेतला तर आपल्याला असं लक्षात येईल कि,आपण ह्या रोगाला पळवून लावण्यासाठी खुप कमी पडतोय आणि आज आपल्या देशामध्ये एक लाख कर्करोग्यांपैकी 40,000 रुग्ण दगावले जात आहेत,हे वास्तव आहे. दिवसेंदिवस स्त्रियांना होणाऱ्या कर्करोगाचं प्रमाण वाढत आहे. तसेच स्त्रियांना होणाऱ्या स्तनाच्या, गर्भाशयाच्या कर्करोगा बाबत आपल्या देशात स्क्रिनिंग टेस्ट होत नाहीत. लोकांमध्ये एखाद्या रोगाबाबतचे,शिक्षण, जाणीव आणि जागृती करणे आणि त्याचबरोबर तो रोग झाल्यास उपचार सुलभ मिळावे यासाठी ही मोहीम राबवित आहोत.
महिलांच्या निरोगी आरोग्य आणि सुखद जीवनासाठी 'हेल्थ फाॕर हर' उपक्रम राबविणार: नवोदिता घाटगे
|