बातम्या

सर्व वकील बंधू-भगिनींना नम्र निवेदन

Humble message to all lawyer brothers and sisters


By nisha patil - 6/26/2024 11:51:20 AM
Share This News:



 मंगळवार दिनांक 26 जून 2024  रोजी शहाजी लॉ कॉलेज येथे 'Replacement of Criminal Laws' या विषयावर एक दिवसाचे वर्कशॉप आयोजित केलेले आहे या कार्यक्रमाकरिता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कोल्हापूर या प्रमुख पाहुणे असून कार्यक्रमांमध्ये मुख्य वक्ते , आदरणीय श्री शेखर नाफडे 

सीनियर कौन्सिल सुप्रीम कोर्ट

हे आहेत  शेखर नाफडे सर यांनी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन करिता सुप्रीम कोर्ट मध्ये आपण दाखल केलेल्या पिटीशन मध्ये कामकाज पाहिलेले आहे व पाहत आहेत व ते आपल्या सहा जिल्ह्यातील रत्नागिरी येथील सुपुत्र आहेत सदर कार्यक्रमांमध्ये कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने त्यांचा देखील सत्कार करण्यात येणार आहे. तरी सर्व वकील बंधू-भगिनींना नम्र विनंती आहे की सर्वांनी सदर वर्कशॉप करिता  मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा... 

 वर्कशॉप साठी ज्यांचे रजिस्ट्रेशन झालेले नाही पण त्यांना यायची इच्छा आहे. असे वकील वर्कशॉप साठी येऊ शकतात, वर्कशॉप साठी कोणताही प्रकारचा ड्रेस कोड नाही, पण फॉर्मल ड्रेस कोड परिधान करावा. वर्कशॉप साठी जास्तीत जास्त वकील बंधू-भगिनींनी उपस्थित राहावे ही विनंती ...


सर्व वकील बंधू-भगिनींना नम्र निवेदन