बातम्या

भारत पुन्हा ठरला कास्य पदकाचा मानकरी

India in madel weener


By nisha patil - 7/30/2024 6:20:28 PM
Share This News:



भारत पुन्हा  ठरला कास्य पदकाचा मानकरी

मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी रचला इतिहास

              

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकर आणि सरबज्योतसिंग यांच्या जोडीने इतिहास रचला आहे. 10 मीटर एअर पिस्टल मिश्र प्रकारात भारताने कांस्य पदक जिंकलं आहे. तसेच एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदक जिंकणारी मनू भाकर पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
             

  पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने दुसरे पदक जिंकले आहे. मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी दक्षिण कोरियाच्या ली वोंहो आणि ओ ये जिन या जोडीचा 16-10 असा पराभव करून कांस्यपदक जिंकले. 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत भारताला हे पदक मिळाले आहे. मनू भाकरचे हे दुसरे ऑलिम्पिक पदक आहे.


भारत पुन्हा ठरला कास्य पदकाचा मानकरी