बातम्या
कोल्हापुरात पासिंग दंडाविरोधात वाहतूक संघटनेचे जेलभरो आंदोलन
By nisha patil - 2/7/2024 1:28:00 PM
Share This News:
महाराष्ट्र सरकारने रिक्षा टॅक्सि यांना दररोज पासिंग दंड ५० रुपये आकारणी केलीय.या निर्णयामुळे राज्यभरातील रिक्षा व टॅक्सी चालकांची पिळवणूक होणार आहे.सरकारच्या या निर्णयाविरोधात राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत.याच पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरात रिक्षा व टॅक्सी चालक संघटनांच्या वतीनं जेलभरो आंदोलन करण्यात आलं.सकाळी दहा वाजता शहरातील दाभोळकर कॉर्नर परिसरात आंदोलनाला सुरवात झाली.यावेळी सरकारच्या या निर्णयाचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
कोल्हापुरात पासिंग दंडाविरोधात वाहतूक संघटनेचे जेलभरो आंदोलन
|