बातम्या

जलजीवन मिशनचे काम सहा महिन्यांपासून रखडले; राजू शेट्टी यांची केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांच्याकडे मागणी

Jaljivan Mission stalled

By nisha patil - 1/17/2025 5:40:09 PM
Share This News:

जलजीवन मिशनचे काम सहा महिन्यांपासून रखडले; राजू शेट्टी यांची केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांच्याकडे मागणी

केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील पेयजल योजनेचे काम सहा महिन्यांपासून निधी न मिळाल्याने रखडले आहेत. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांना दिल्ली येथे भेटून तातडीने निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये योजनेतील कामे रखडल्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते.

यावेळी शेट्टी यांनी अपुरे कामे आणि निधीच्या समस्येवर चर्चा करत संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी केली. कोल्हापूर जिल्ह्यातील १७ नवीन जलजीवन योजना १४ मार्च २०२४ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाल्या असून निविदा प्रक्रिया व काही तांत्रिक कारणामुळे चार योजनांची निविदा रद्द केली जाणार आहे.

जलजीवन मिशनचे काम सहा महिन्यांपासून रखडले; राजू शेट्टी यांची केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांच्याकडे मागणी
Total Views: 33