बातम्या

महावितरणकडून कोल्हापूर, सांगलीत तीन महिन्यात ग्राहकांच्या 36 हजार तक्रारी निकाली

Mahavitaran settled 36 thousand customer complaints in Kolhapur


By nisha patil - 6/7/2024 11:49:11 AM
Share This News:



कोल्हापूर  : ग्राहक समाधानास प्राधान्य देऊन महावितरणने ग्राहकांना घरबसल्या वीजसेवेबाबत ऑनलाईन तक्रारी दाखल करण्यासाठी संकेतस्थळ, मोबाईल ॲप, टोल फ्री क्रमांक, ई-मेल, एसएमएस, ऊर्जा चॅटबॉट, मिस्ड कॉल सेवा असे विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. शिवाय नजिकच्या शाखा, उपविभाग इ. कार्यालयात भेट देऊन ग्राहक तक्रार दाखल करू शकतात. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात एप्रिल ते जून 2024 या गत तीन महिन्याच्या कालावधीत ग्राहकांनी विविध पर्यायाव्दारे महावितरणकडे खंडित वीजपुरवठा, वीजदेयक व इतर वीज सेवा-सुविधेबाबतच्या 36 हजार 601  दाखल केल्या होत्या. त्यातील 36 हजार 574 तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. तक्रारी निकालीचे हे प्रमाण 99.92 टक्के आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात ग्राहकांच्या खंडित वीज पुरवठ्याच्या 17 हजार 574, वीजदेयक विषयक 8304 व इतर वीज सेवा-सुविधेबाबतच्या 925 अशा एकूण 26 हजार 803  दाखल तक्रारीपैकी 26 हजार 800 तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. सांगली जिल्ह्यात ग्राहकांच्या खंडित वीजपुरवठ्याच्या 4822, वीजदेयक विषयक 4535 व वीज सुविधेबाबतच्या 441 अशा एकूण 9 हजार 798  दाखल तक्रारीपैकी 9 हजार 774 तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. ग्राहकांनी तक्रारी व माहितीसाठी  महावितरणचे अधिकृत संकेतस्थळावरील www.mahadiscom.in ग्राहक पोर्टल,  महावितरण मोबाईल ॲप, 1800-233-3435, 1800-212-3435, 1912, 19120 हे  ग्राहकांच्या 24/7 सेवेतील टोल फ्री क्रमांक, ऊर्जा चॅटबॉट, ई-मेल आयडी customercare@mahadiscom.in  या सुविधांचा लाभ घ्यावा. ग्राहक ऑनलाईन वीजदेयकबाबतच्या तक्रारी helpdesk_pg@mahadiscom.in या ई-मेल आयडीवर नोंदवू शकतात. वीजपुरवठा खंडितची तक्रार ग्राहक क्रमांकाशी संलग्न, नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 022-50897100 या क्रमांकावर मिसकॉल देऊन, 9930399303 या मोबाईल क्रमांकावर NOPOWER <12 अंकी ग्राहक क्रमांक>  असा ‘एसएमएस’ पाठवून नोंदविता येते. महावितरण संकेतस्थळ  वा मोबाईल ॲपवर मोबाईल क्रमांक नोंदविण्याची वा अद्यावत करण्याची सोय आहे.


महावितरणकडून कोल्हापूर, सांगलीत तीन महिन्यात ग्राहकांच्या 36 हजार तक्रारी निकाली