बातम्या

उन्हाळ्याच्या दिवसात घरच्याघरी तयार करा ‘हे’ फेसपॅक

Make this face pack at home on hot summer days


By nisha patil - 3/30/2024 9:22:03 AM
Share This News:



उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेच्या अनेक समस्या डोके वर काढू लागता. यामध्ये सुर्याच्या किरणांचा परिणाम त्वचेवर होत जातो. त्यामुळे मग ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स, त्वचा टॅन अशा समस्या वाढू लागतात. तीव्र उन, धूर, धुळ, प्रदुषण, घाम यामुळे त्वचेचे नुकसान होते. उन्हाळ्याच्या दिवसात त्वचा तेलकट होणे, चिपचिप होण्यासाठी अनेक कारण असतात. उन्हापासून बचाव करण्यासाठी मुली अनेक प्रकारचे प्रोडक्टचा वापर आपल्या चेहऱ्यावर करत असतात. या प्रोडक्टमध्ये अनेक प्रकारचे रसायने असतात. उन्हाच्या किरणांपासून तुम्हा घरगुती उपाय करु शकता. घरात फेसपॅक तयार करुन तो पॅक तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर वापरु शकता. यामध्ये आपण हे फेसपॅक घरी तयार करु शकता.
दही आणि कोरफडचे फेसपॅक

 

दही आणि कोरफडचे फेसपॅक तयार करताना ४ चमचे कोरफडचे गरे आणि १ चमचा दही एकत्रित करुन घ्या, हे मिश्रण २० मिनिटांसाठी चेहऱ्यावर राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. यानंतर चेहऱ्यावर नक्कीच बदल होईल.

टोमॅटो आणि मधापासून तयार करु शकता फेसपॅक
टोमॅटोच्या रसामध्ये १ चमचा मध मिसळा आणि २० मिनिटांसाठी चेहऱ्यावर राहू द्या. आठवड्यातून दोन-तीन वेळा हे फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यास चेहरा उजळण्यास मदत होईल.

काकडीपासून तयार करु शकता फेसपॅक
काकडीच्या सालीवर साखर लावा १५ ते २० मिनिट ते फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. त्यानंतर संपूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित लावा आणि २० मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून टाका.


उन्हाळ्याच्या दिवसात घरच्याघरी तयार करा ‘हे’ फेसपॅक
Total Views: 9