बातम्या
शिवराजेश्वर मंदिरासाठी दरमहा ५० हजार रुपये अनुदान
By nisha patil - 3/29/2025 5:14:38 PM
Share This News:
शिवराजेश्वर मंदिरासाठी दरमहा ५० हजार रुपये अनुदान
सिंधुदुर्ग किल्ला आणि परिसराच्या विकासाची मागणी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिरासाठी दरमहा ५० हजार रुपये अनुदान देण्याचे आदेश दिले. हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात मागणी केली होती. यावेळी शिंदे यांनी महसूल विभागाच्या सचिवांना तातडीने प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आणि वैयक्तिकरित्या ५० हजार रुपयांची मदतही जाहीर केली.
समितीने औरंगजेबाच्या कबरीसाठी होणाऱ्या निधी खर्चावर आक्षेप घेत, तो बंद करण्याची आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी अधिक निधी देण्याची मागणी केली. तसेच, सिंधुदुर्ग किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचेही निवेदन देण्यात आले.
शिवराजेश्वर मंदिरासाठी दरमहा ५० हजार रुपये अनुदान
|