बातम्या
नेहा कुंभार यांना एशिया बुक रेकॉर्ड कडून" ग्रँड मास्टर" पदवी बहाल
By nisha patil - 6/25/2024 3:34:49 PM
Share This News:
नेहा कुंभार यांना एशिया बुक रेकॉर्ड कडून" ग्रँड मास्टर" पदवी बहाल
इचलकरंजी: इचलकरंजी येथील नेहा उदयकुमार कुंभार या मूळच्या वसगडे सांगली जिल्याह्यातील आहेत, पण त्यांचे बालपण, शिक्षण मुंबई येथे झाले वडिलांच्या नोकरीनिम्मत त्यांचे वास्तव्य मुंबई येथे होते . त्यांचे लग्न इचलकरंजी येथील उदयकुमार याच्यासोबत झालेनंतर त्यांनी उत्तम गृहिणी,उत्तम आई हे कर्त्यव्य पार पडत असताना सोबत त्यानी घरातूनच ज्वेलरी मेकिंग चे काम सुरु केले . त्याच्या या कामामध्ये इतकी सुबकता व नवीनता होती कि त्याचेकडे या ज्वेलरी ची मागणी वारंवार होऊ लागली .
नेहा यांच्या दागिन्यांच्या मेकिंगमुळे त्याचेकडे महिला, मुली यांनी क्लासेस घेणेची विनंती केली . नेहा यांनी घरातून सुरु केलेले ज्वेलरी मेकिंग चे कामाची दखल इचलकरंजी येथील डॉ ज्ञानेश्वरमुळे फौंडेशन ने घेऊन त्यांना त्यांचे फाऊंडेशन अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना ज्वेलरी मेकिंग ट्रेनिंग देऊन त्याचा स्वतःचा उद्योग सुरु करण्यास आर्थिक सक्षम बनवले . सुमारे दहाहजार महिलांना त्यांनी आर्थिक सक्षम बनवले आहे त्यांची नोंद एशिया बुक रेकॉर्ड कडून घेणेत आली आहे सातत्याने १९ वर्षे ते या काम करत आहेत त्याच्या या कामास एशिया बुक रेकॉर्ड कडून "ग्रँड मास्टर " हि पदवी बहाल करून सन्मानित करणेत आली आहे . त्यांच्या या यशामध्ये त्यांचे पती ,मुली , सासू व कुटुंबीय यांची मोलाची साथ लाभली आहे
त्याच्या या यशास तारा न्युज कडून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
नेहा कुंभार यांना एशिया बुक रेकॉर्ड कडून" ग्रँड मास्टर" पदवी बहाल
|