बातम्या

लाडकी बहीण योजनेअंतर्गत कागदपत्रे त्वरित देण्याचा मनसेकडून आदेश..

Order from MNS to give documents under Ladki Bahin Yojana immediately


By nisha patil - 2/7/2024 7:47:47 PM
Share This News:



महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर तर्फे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले  व शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांचे नेतृत्वाखाली आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नागरिकांच्या येणाऱ्या समस्या संदर्भात करवीर तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत उत्पन्नाचा दाखला, डोमिसाईल सर्टिफिकेट माता-भगिनींना त्वरित मिळणे गरजेचे आहे. तहसीलदारांच्या डेस्क ला येईपर्यंत अगोदर तीन डेस्क मधून परमिशन द्यावी लागत असल्याने प्रत्येक डेस्कला वेळ लागत आहे. तरी आपण या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन सर्व डेस्कला ऑनलाईन अर्ज आल्यानंतर ते लगेचच ऍप्रूव्ह करण्यासंदर्भात त्वरित सूचना द्याव्यात. जेणेकरून उत्पन्नाचा दाखला व डोमेसाईल सर्टिफिकेट साठी कोल्हापुरातील माता-भगिनी लाडकी बहीण योजनेच्या अनुदानापासून वंचित राहू नयेत. मनसे कोल्हापूर तर्फे  स्वतः या योजनेअंतर्गत लागणारे सर्व उत्पन्नाचे दाखले, डोमेसाईल सर्टिफिकेट व सर्व कागदपत्रे स्वखर्चाने माता भगिनींना मोफत काढून देत आहोत. शनिवार व रविवार सुट्टीच्या दिवशी देखील सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी स्वप्निल रावडे यांनी मनसेला दिले तरी उत्पन्नाचे दाखले व डोमेसाईल सर्टिफिकेट तात्काळ द्यावीत अशी मागणी मनसेतर्फे शहराध्यक्ष प्रसाद पाटील व तालुकाध्यक्ष अभिजीत पाटील यांनी केली.


लाडकी बहीण योजनेअंतर्गत कागदपत्रे त्वरित देण्याचा मनसेकडून आदेश..