बातम्या

वाहतुकीची कोंडी रोखा - करवीर तालुका उबाठा ची मागणी

Prevent traffic congestion  Karveer taluka demand for Ubatha


By nisha patil - 3/7/2024 6:15:52 PM
Share This News:



तावडे हॉटेल उड्डाण पुल व उचगाव उड्डाण पुल येथे वाहतुकीची कोंडी होत असल्याने पोलिसांच्या सुचनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्था व आमदार फंडातून सिग्रल यंत्रणा काही वर्षापुर्वी बसविण्यात आली. मात्र सध्या ही सिग्रल यंत्रणा बंद स्वरूपात आहे. दोन्ही उड्डाण पुलाखाली वाहतुकीची कोंडी होतीय.ही कोंडी सोडवण्यासाठी  सिग्नल यंत्रणा पुर्ववत सुरू करावी अशी मागणी करवीर तालुका शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आलीय.या संदर्भातील निवेदन तालुकाध्यक्ष राजू यादव यांच्या नेतृत्वात गांधीनगर पोलीस ठाण्यास देण्यात आलय.दरम्यान येत्या आठ दिवसात ही यंत्रणा सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्यात येईल. असा इशारा देण्यात आलाय.
  
दरम्यान यावेळी या दोन्ही उड्डाण पुलाखालील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करून सिग्नल यंत्रणा पूर्ववत चालू केली जाईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

यावेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, विभाग प्रमुख दीपक फ्रेमवाला, विभाग प्रमुख वीरेंद्र भोपळे, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते


वाहतुकीची कोंडी रोखा - करवीर तालुका उबाठा ची मागणी