बातम्या

पुणे हादरले!येरवड्यात घडली भयंकर घटना

Pune shook Terrible incident happened in Yerwada


By nisha patil - 6/25/2024 7:51:08 PM
Share This News:



पुण्यातील येरवडा भागात ही  धक्कादायक घटना घडली आहे.  लहाडे व शेख कुटुंबीय एकाच परिसरात वास्तव्यास आहे. कटाळू यांचा मुलगा आणि इस्माईल याची बहिण या दोघांमध्ये मैत्री होती. आज सकाळी कटाळू यांचा मुलगा व संबंधित तरुणी घरातून निघून गेले. बहिणीला कटाळू यांच्या मुलानेच पळवून नेल्याचा संशय इस्माईल याला आला. त्या रागातूनच आज कटाळू याच्यावर इस्माईल याने रागातून धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून केला.
 

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियकराने बहिणीला फूस लावून पळवून  नेऊन आंतरधर्मीय विवाह  केल्याच्या रागतून मुलीच्या भावाने टोकाचे पाऊल उचलले आहे. तरुणीचा भाऊ  इस्माईल शेखने कोयत्याने सपासप वार केले आहे. लहाडे  उभे असताना  दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एकाने लहाडे यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये लहाडे यांच्या डोक्याला आणि हातावर वार केल्याने प्रचंड रक्तस्त्राव झाला आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. मृत लहाडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला आहे.  एकीकडे कोयता गँग,  ड्रग्ज प्रकरणाने पुण्याचे वातावरण तापले असताना या भयंकर घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.  घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.


पुणे हादरले!येरवड्यात घडली भयंकर घटना