बातम्या

रांगड्या मातीतला.. "रांगडा" सिनेमा १२ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला..!!

Rangdya matitala Rangda movie to meet the audience on July 12


By nisha patil - 4/7/2024 8:05:24 PM
Share This News:



 कुस्ती , बैलगाडा शर्यत ,लव्ह स्टोरी , ॲक्शन , फ्रेंडशिप अशा ग्रामीण भागाशी नाळ जोडलेला रांगड्या मातीतील  " रांगडा " हा चित्रपट येत्या १२ जुलैला प्रदर्शित होतोय.पैलवान भूषण शिवतारे आणि मयुरी नव्हाते यांची चित्रपटात प्रमुख भूमिका आहे.तर शेतकरी पुत्र प्रॉडक्शन या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून योगेश बालवडकर, किरण फाटे,राहुल गव्हाणे, मच्छिन्द्र लंके, अब्बास मुजावर, आयुब हवालदार यांनी “रांगडा” या चित्रपटाची निर्मिती केलीय.

सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाला कुस्ती आणि बैलगाडा शर्यतीचा असलेला छंद, त्यासाठी त्याला करावा लागणारा संघर्ष हे रांगडा चित्रपटाचं मुख्य कथासूत्र आहे. त्याशिवाय तगडे, बलदंड नायक, खलनायक,देखणी नायिका असल्यानं प्रेमकथा, राजकारण, तुफान ॲक्शनचा धडाकेबाज तडका या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.या चित्रपटाबद्दल अनुभव सांगताना नायिका मयुरी नव्हाते सांगते..


रांगड्या मातीतला.. "रांगडा" सिनेमा १२ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला..!!