राजकीय
रत्नागिरी ते नागपूर महामार्ग भूसंपादन: शेतकऱ्यांना चारपट भरपाईसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा
By nisha patil - 1/25/2025 8:30:04 PM
Share This News:
रत्नागिरी ते नागपूर महामार्ग भूसंपादन: शेतकऱ्यांना चारपट भरपाईसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन प्रक्रियेबाबत बैठक पार पडली. यावेळी NHAI अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. मागील भूसंपादन प्रक्रियेप्रमाणे शेतकऱ्यांना चारपट भरपाई मिळावी, यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले.
बैठकीला खासदार धैर्यशील माने, दलितमित्र आमदार डॉ. अशोकराव माने, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके यांसह विभागीय अधिकारी उपस्थित होते.
रत्नागिरी ते नागपूर महामार्ग भूसंपादन: शेतकऱ्यांना चारपट भरपाईसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा
|