शैक्षणिक
मठ्ठ विद्यार्थी दाखवा आणि लाख रुपये मिळवा...
By nisha patil - 2/25/2025 4:57:36 PM
Share This News:
मठ्ठ विद्यार्थी दाखवा आणि लाख रुपये मिळवा...
शाळेच्या ओपन चॅलेंजने वेधले सर्वांचे लक्ष
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील बेवनाळ जिल्हा परिषदेच्या शाळेने अनोखी शैक्षणिक मोहिम हाती घेतली आहे. "लिहिता-वाचता न येणारा विद्यार्थी दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा" असा फलक शाळेच्या गेटवर लावण्यात आला आहे. केवळ दोन शिक्षक असलेल्या या शाळेतील २४ विद्यार्थ्यांनी वाचन, लेखन आणि संख्याज्ञानात उत्तम प्रगती केली आहे, त्यामुळे हा प्रयोग चर्चेचा विषय ठरत आहे.
मठ्ठ विद्यार्थी दाखवा आणि लाख रुपये मिळवा...
|