बातम्या
व्हीएसआयच्या ज्ञानयाग व ज्ञानलक्ष्मी ऊस प्रशिक्षणात 'शाहू'च्या शेतकऱ्यांचा सहभाग
By nisha patil - 7/28/2024 9:12:33 PM
Share This News:
*व्हीएसआयच्या ज्ञानयाग व ज्ञानलक्ष्मी ऊस प्रशिक्षणात 'शाहू'च्या शेतकऱ्यांचा सहभाग*
*आजअखेर५१५महिला तर ७१४पुरुष सभासद शेतकऱ्यांना लाभ *
कागलः राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची शिखर संस्था असलेल्या पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट तथा व्हीएसआयमार्फत घेण्यात येणाऱ्या प्रशिक्षणात आपल्या शाहू साखर कारखान्याच्या ४१महिला व ४१पुरुष अशा एकूण ८२सभासदांनी यावर्षी सहभाग घेतला.आजअखेर महिलांसाठीच्या ऊस शेती ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत ५१५तर पुरुषांसाठीच्या ज्ञानयाग प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत ७१४शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे.
ऊसाची व साखरेची उत्पादकता वाढवण्यासाठी ऊस शेतीत आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे व त्याचा प्रत्यक्ष वापर होण्यासाठी या प्रशिक्षण कार्यक्रमाचे व्हीएसआयमार्फत गत पस्तीस वर्षापासून आयोजन करण्यात येत आहे.ऊस शेतीत महिलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे गेल्या एकोणीस वर्षापासून महिलांसाठी स्वतंत्र ऊस शेती ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो.त्यामध्ये शाहू साखर कारखान्याच्या महिला शेतकरी दरवर्षी सहभागी होतात.त्याचा ऊस शेतीमध्ये उपयोग करून उत्पादनात वाढ होण्यासाठी फायदा झाला आहे.या प्रशिक्षण कार्यक्रमात व्हीएसआयचे शास्त्रज्ञ शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान या विषयावर प्रात्यक्षिकासह सविस्तर मार्गदर्शन करतात.
शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी कारखान्यामार्फत महिला व पुरुष सभासद शेतकरी या प्रशिक्षणासाठी पाठवण्याची परंपरा सुरू केली.त्यांच्या पश्चात कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी ही परंपरा कायम चालू ठेवली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांसह इतर राज्यातील कारखान्यांच्या निवडक दोनशे महिला दरवर्षी या प्रशिक्षणामध्ये सहभागी होतात.त्यापैकी शाहू साखर कारखान्याच्या ४१महिलांचा समावेश होता.विशेष म्हणजे या महिला सभासदांसह आजअखेर प्रशिक्षण घेतलेल्या महिलांकडून व्हीएसआयकडून आकारण्यात येणारी प्रशिक्षण फी न घेता कारखान्यामार्फत भरली जाते.शाहू साखर कारखान्याने महिलांच्या ऊस शेतीतील योगदानास अशा वेगळ्या पद्धतीने प्रोत्साहन दिले आहे.
व्हीएसआयच्या ज्ञानयाग व ज्ञानलक्ष्मी ऊस प्रशिक्षणात 'शाहू'च्या शेतकऱ्यांचा सहभाग
|